Home पूर्व विदर्भ 10 बाळांचा मृत्यू, रुग्णालयाचे आॅडिट करण्याचे निर्देश

10 बाळांचा मृत्यू, रुग्णालयाचे आॅडिट करण्याचे निर्देश

127

भंडारा / मुंबई : भंडाºयातील शासकीय सामान्य रुग्णालयात शनिवारी रात्री आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व रुग्णालयांचे तातडीने आॅडिट करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

बाळांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेत म्हटले, की ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटनासाठी जबाबदार असणाºयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तसेच, राज्यातील अन्य रुग्णालयातील ‘शिशू केअर युनिट’चे तातडीने अंकेक्षण (आॅडिट) करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली असून तपासाचे आदेश दिले आहेत.दरम्यान, या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ेकेंद्रीय मंत्री अमित शहा, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

शॉर्ट सर्किटमुळे आग
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (रठउव) शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अंदाजे दोन वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत असून, धुरामुळे गुदमरून 10 बालकांचा मृत्यू झाला़ घटनेच्या वेळी या कक्षात एकूण 17 नवजात होती. यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले.
सुरुवातीला कर्तव्यावर असलेल्या नर्सला ही बाब दिसून आल्यानंतर तिने तातडीने रुग्णालयातील अधिकाºयांना माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here