Home उपराजधानी नागपूर पंतप्रधान सोमवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

पंतप्रधान सोमवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

64

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी उद्या सोमवारी ११ जानेवारीला दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
चर्चेच्या कार्यक्रमपत्रिकेवर कोविड-१९ परिस्थिती आणि देशभरात राबवायची संभाव्य लसीकरण मोहीम आदी प्रमुख विषय असल्याचे समजते.

***

गुजरातचे माजी मुख्यमंत्री,काँग्रेस नेते माधवसिंह सोळंकी यांचे निधन

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ काँग्रेस नेते माधवसिंह सोळंकी यांचे शनिवारी सकाळी गांधीनगरमध्ये निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
सोळंकी यांनी गुजरातचे चार वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. तसेच, केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अन्य नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या. गुजरात सरकारने एक दिवसाचा दुखवटा घोषित केला आहे.

***

भारताच्या वाट्याला यूनोच्या तीन प्रमुख समित्यांचे अध्यक्षपद

नवी दिल्ली : भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तीन प्रमुख समित्यांचे अध्यक्षपद मिळाल्याची माहिती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी दिली.
सन २०२२ साठीची दहशतवादविरोधी समिती, तालिबान निर्बंध समिती आणि लीबिया निर्बंध समितीच्या अध्यक्षपदाचा यात समावेश आहे.
दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद मिळणे भारतासाठी विशेष उल्लेखनीय असल्याचे तिरुमूर्ती यांनी नमूद केले. सीमेपलीकडील दहशतवादाचा सर्वाधिक फटकाही भारताला बसला आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताची अफगाणिस्तानबद्दल असलेली शांतता, सुरक्षा, विकास आणि प्रगती याविषयीची बांधिलकी लक्षात घेता तालिबान निर्बंध समितीला नेहमीच प्राधान्य राहिले आहे़ लीबियासंबंधी शांतता प्रक्रियेवर सगळ्या जगाचे लक्ष असताना त्याविषयीच्या समितीचं अध्यक्षपद महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

***

जलशक्ती मंत्रालयाच्या जीवन मिशनमध्ये परभणी जिल्हा अव्वल

नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत २०२०-२१ या वर्षासाठी ठरवून दिलेलं नळजोडणीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करून परभणी जिल्ह्याने मराठवाड्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पिण्यायोग्य शुद्ध पाणी नळाद्वारे पुरवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र्र शासनाने हाती घेतला आहे.

 

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here