Home राजधानी मुंबई मोठा निर्णय : राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात

मोठा निर्णय : राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात

96

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आपल्या काही नेत्यांसह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात केली आहे.

महाविकास आघाडी सरकारची दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘झेड’ दर्जाची सुरक्षा [ Z security ] काढली असून विधानसभेतील विरोधीपक्षनेते तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडी काढण्यात आली. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ‘वाय’ सुरक्षा दिली आहे ती आधी ‘वाय प्लस’ दर्जाची होती.