ये अख्खा इंडिया जानता है, हम बाईक पे सात है…

उपराजधानी नागपूर

ये अख्खा इंडिया जानता है, हम तुम पे मरता है….हे रोनित राय यांच्यावर चित्रित झालेलं हिंदी चित्रपट गीत आहे़ काही वर्षांपूर्वी पडद्यावर आलेल्या ‘जान तेरे नाम’ मधील गाणं अनेकांच्या आवडीचं आहे.
आता हे छायाचित्र सुद्धा अख्या इंडियात अर्थात भारतात पसरले आहे.(व्हायरले आहे.) कारण या दुचाकीवर एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे तर चक्क सातजण बसून प्रवास करत आहेत. आणि पोलिसांनी चक्क हात टेकले आहे. (अर्थातच जोडावे लागले आहे़) कारण कारवाई करणार तर कशी? संपूर्ण कुटुंबच त्यावर आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वयोगटातील एक मुलगा दिसून येतेयं. हा फोटो खूप व्हायरल होत आहे.

माहितीनुसार, हे छायाचित्र बिहारमधील ढाका (बांग्लादेशातील नव्हे) येथील आहे. हे शहर बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते. यातील गमतीचा भाग सोडला तर, असा प्रवास निश्चितच धोकादायक आहे़ हा प्रकार निश्चित समर्थनिय नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *