Home राष्ट्रीय केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला अपघात, पत्नीचा मृत्यू

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला अपघात, पत्नीचा मृत्यू

103

accident-with-minister-shreepad-naik : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कार वाहनाला अपघात झाला असून पत्नी विजया यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते यल्लपुराहून गोकर्ण येथे प्रवास करीत होते.
श्रीपाद नाईक हे कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करता त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यावेळी त्यांची कार पलटल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला.
श्रीपाद नाईक यांच्याशिवाय इतर तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर श्रीपाद नाईक यांनाही तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर गोव्यात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.