Home पूर्व विदर्भ मृत बालकांच्या मातांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, मंत्री यशोमती ठाकूर यांचे आदेश

मृत बालकांच्या मातांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, मंत्री यशोमती ठाकूर यांचे आदेश

35

भंडारा : सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बालकांच्या मातांची नियमित आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
श्रीमती ठाकूर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन घटनेची पाहणी केली. जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलिस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक प्रदीप काठोळे, सीडीपीओ राहुल निपसे यांच्या अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीसंदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडून घेतली. शिशू केअर युनिटला मध्यरात्री लागलेल्या आगीत आयसीयुमध्ये भरती असलेल्या दहा बालकांचा मृत्यू झाला तर सात बालकांना वाचविणे शक्य झाले. आग विझविण्यासाठी सुरक्षा रक्षक व त्यांच्या सहकाºयांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर अग्निशमन विभाग तात्काळ घटनास्थळी पोहचल्यामुळे आगीवर नियंत्रण शक्य झाले. सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांनी तात्काळ बालकांना इतर वॉर्डात हलविले. तसेच नातेवाईकांना बालकांचे मृतदेह सुपूर्द करण्यात आले. सानुग्रह अनुदानाची रक्कम सुद्धा तत्काळ वितरित करण्यात आली. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या दृष्टीने न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथम, विद्युत निरीक्षक, व्हीएनआयटी, राष्ट्रीय अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ज्ञ, विद्युत, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा यांना पत्र पाठवून मातांची अंगणवाडी सेविका, आशा व एएनएम यांचे कडून नियमित आरोग्य तपासणी करुन आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देश दिले. घटनेत मृत झालेली बालके संबंधित रुग्णालयात का दाखल करण्यात आली होती, याबाबतचा अहवाल तात्काळ आयुक्तालयास पाठविण्याचे निर्देशही या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

दरम्यान, मृत बालकांच्या मातांना नियमित समुपदेशन करून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या सूचना मंत्री ठाकूर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिल्या. मातांची घरपोच आरोग्य तपासणी डॉक्टर्सनी करावी व दैनंदिन अहवाल आशा मार्फत मला कळवावा. यासाठी स्वयंसेवी संस्थांची सुद्धा मदत घेण्याची सूचना केली. जळीत प्रकरणांतील मृत बालकांच्या माता योगिता विकेश धुळसे श्रीनगर व रावणवाडी येथील वंदना मोहन सिडाम यांना भेट देवून त्यांचे सांत्वन केले़ मातांच्या आरोग्याविषयी कोणतीही हयगय होता कामा नये. मातांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here