Home राष्ट्रीय तिन्ही कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती

तिन्ही कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती

102

नवी दिल्ली, 12 जानेवारी : सर्वोच्च न्यायालयाकडून नवीन तिन्ही कृषी कायद्याच्या [ new farmers laws ] अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली आहे़ यात एका समितीचे गठन करण्यात आले असून, समितीत चार सदस्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

सप्टेंबर 2020 पासून सुरू असलेल्या शेतकºयांच्या आंदोलनाबाबत सरकारसोबत अनेक चर्चाच्या फेºया झाल्या होत्या.
सोमवारच्या सुनावणीदरम्यान सर्वाेच्च न्यायालयाने [ supreme court ]  कडक शब्दात केंद्र सरकारला सुनावले होते. न्यायालयाकडून तयार केलेल्या समितीमध्ये चर्चा होईपर्यंत कायदा थांबवायला हवा, अन्यथा हा कायदा रोखण्यात येईल, असे म्हटले होते़ अखेर सर्वोच्च न्यायालयाने आज हा महत्त्वाचा आदेश दिला आहे.