श्वेत बाणा माझा अजून दीपज्योत बाकी
आस
सारेच पांगले कसे
उघडी पडली नाती
विस्कटले जरी घरटे
सांधेल काडी काडी
त्यांची भाषा बघा
मला साथ देण्याची
शब्द फिरविती
जात बेगडी सरड्याची
असला वाळवंट रुजाया
शत अंकुर अंतरी
बहरे रूक्ष दिन सारे
वाहे छाया...
रक्तानेच दिले दु:ख मला अश्वत्थाम्याचे
मोक्ष
घाम भाळीचा पुसता
श्रमाचा ध्यास घेता
मी वेचत गेलो मज... सर्वकाळ !
रक्तानेच दिले दु:ख
मला अश्वत्थाम्याचे
फुंकत गेलो आरक्त... जखमा किती !
वाटे चेतावा हा देह
राख व्हावी तनाची
मन राहावे...
शेतातील खळे झालीत गायब…शब्द लालित्य
ज्वारीचं खुडणं आटोपत आलं की घरातील दोघे - चौघे मजुरांसह खळे तयार करण्याच्या तयारीला लागायचे़ शेतात मेहनतीनं तयार केलेली पिकं घरात यावी, यासाठी...
झोका प्रीतीचा तू दे मला होवू दे श्रावण…
मला होवू दे श्रावण...
काळजाच्या झुल्यावर
आभाळाला भिडे मन
झोका प्रीतीचा तू दे
मला होवू दे श्रावण...
सरसर पावसाच्या
उतरती सोनसरी
चमचमत्या उन्हांची
गळ्यामध्ये गळसरी
गळाभेटीचा आपुल्याही
येवो असा गोड क्षण
मला होऊ...