राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२० साठी प्रवेशिका आमंत्रित

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी 1 जानेवारी  ते 31 डिसेंबर, 2020 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे […]

Continue Reading

शक्ती फौजदारी कायद्यातील सुधारणांसाठी महिला संघटना, तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांना सूचना करण्याचे आवाहन

मुंबई / नागपूर : राज्यात लागू असलेल्या लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण या अधिनियमात सुधारणा करण्याकरिता विधेयकातील विषयांमध्ये स्वारस्य असलेल्या व्यक्तींकडून (महिला संघटना, स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रातील विधिज्ञ) सुधारणा अथवा सूचना मागविण्यात येणार असून त्यानुसार इच्छुकांनी आपल्या सुधारणा व सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे पाठविण्याचे आवाहन विधानमंडळाचे सचिव  राजेन्द्र भागवत यांनी केले आहे. सन २०२० चे […]

Continue Reading

आता खवल्या मांजरांना मिळणार सुरक्षा कवच, अभ्यासगटाची स्थापना

मुंबई  : राज्यातील खवल्या मांजरांना आता सुरक्षा कवच मिळणार असून या मांजरांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक (वन्यजीव) रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. हा अभ्यासगट खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेला कृती आराखडा तयार करून राज्य शासनास सादर करील. राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत वन्यजीव मंडळाच्या […]

Continue Reading

संसदेच्या पेट्रोलियम समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : संसदेच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू या विषयावरील स्थायी समितीच्या सदस्यांनी समितीचे अध्यक्ष रमेश बिधुरी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. रमेश बिधुरी यांनी यावेळी राज्यपालांना समितीच्या कार्याची माहिती दिली. समितीचे सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, खासदार राजन विचारे, आंध्र प्रदेश येथील खासदार श्रीमती चिंता अनुराधा, खासदार […]

Continue Reading