राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात शहादा येथे अवैध बिअरसह मुद्देमाल जप्त

मुंबई : नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात अवैध बिअरसह मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. मौजे वाडी गावाचे हद्दीतील पुनर्वसन कोरड्या पोसली नदीच्या पात्रात, ता. शहादा (जि. नंदूरबार) या ठिकाणी दारुबंदी कायद्यांतर्गत छापा टाकून केलेल्या गुन्हा अन्वेषण कारवाईमध्ये मध्य प्रदेश राज्यात निर्मिती केलेल्या व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या […]

Continue Reading

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ

मुंबई : ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 12 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येईल. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र […]

Continue Reading

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता

CABINATE DECISION : राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत  मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 इतकी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 9 […]

Continue Reading

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

CABINATE DECISION : कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या पदांसाठी निवडणुक लढविण्याच्या संधीपासुन वंचित रहावे लागू नये यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या […]

Continue Reading